

Tiger Shroff मुंबई येथे अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुहूच्या पुष्पा पार्क येथे हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अभिनेता टायगर श्रॉफ सुरक्षित असून, त्याला गोळी लागून कोणतीही दुखापत झालेली नाही अशी माहिती मिळत आहे. तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे. बिश्नोई गँगचा हात असल्याचे समोर आले आहे.
या आरोपींनी १० गोळ्या चालवल्याची माहिती समोर आली आह. जूहू पोलिसठाण्यापासून अवघ्या १०० मिटर अंतरावर ही घटना घडली आहे. एक फूटबॉल सामना खेळून तो घरी परतत होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. याचवेळी ही घटना घडली या गोळीबारात टायगर श्रॉफचा चालक व एक चाहता जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमींना नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान या घटनेची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयक्तांना फोन करुन तपासाचे निर्देश दिले आहेत. DCP मोहित गर्ग यांनी सांगितले की, पोलिसांनी या घटनेमध्ये 15 टीम बनवल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत
जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. . या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गोळीबारचं कारण अस्पष्ट असून पोलिस आरोपींचा घेत आहेत शोध घेत आहेत आहेत.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून घरी जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींकडूनअभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सिसिटीव्ही ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. यावेळी टायगर श्रॉफ सोबत त्याचा कारचा चालकही होता.
बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली असून, बिश्नोई टोळीतील अनिल पंडीत व हरमान संधू यांनी एक पोस्ट करुन याची माहिती दिली, त्यांनी म्हटले आहे की आम्ही याला फोन करुन समजावले होते पण तो समजला नाही आता आम्ही याला चांगलीच समज मिळाली आहे. मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधील जो कोण आमची गोष्ट ऐकणार नाही त्याचा पुढील नंबर असेल. सलमान खान सोबत जो ऐकणार नाही त्यांचाही नंबर पुढचा असेल वेट ॲन्ड वॉच असा इशाराही या गँगने दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तपासाचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना फोन करून अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती घेतली. पोलिस आयुक्तांना त्यांनी तत्काळ वेगाने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.