टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांनी दिला दणका

Tiger Group Adhyaksh FIR - अंधेरीतील खासगी प्लॉटचा कब्जा; गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मुलुंड :

अंधेरी पूर्व, मरोळ भागात एका व्यक्तीचा खासगी प्लॉट बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अंधेरी तालुका अध्यक्ष आणि 'टायगर ग्रुप'चे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे याच्यासह १० ते १५ जणांवर पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
BMC Assistant Commissioners Transfer-महानगरपालिकेतील ६ सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खंडागळे आणि कन्ना टोळीकडून मुंबईच्या अंधेरी आणि गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात प्रचंड दहशत पसरवली आहे. ही टोळी थेट लोकांच्या घरात घुसून घरे खाली करणे आणि मोकळे प्लॉट बळकावणे असे प्रकार सर्रास करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधार संजय खंडागळे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

तर त्याचा साथीदार छोटा कन्ना याच्यावर १० गुन्हे आणि मोठा कन्ना याच्यावर हत्या तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १४ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत नोंदवण्यात आले आहेत. या टोळीला स्थानिक राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळेच त्यांचे धाडस वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या दहशतीमुळे अंधेरी आणि आरे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Crime News
South Mumbai Infectious Disease Hotspot | दक्षिण मुंबई साथीच्या आजारांचा 'हॉटस्पॉट'

जमिनी बळकावल्याचा पोलिसांना संशय

या टोळीने अशाच प्रकारे आजवर अनेकांची घरे आणि जमिनी बळकावल्या असल्याचा संशय पोलीस प्रशासनाला आहे. त्यामुळे जर या टोळीकडून कोणाची फसवणूक झाली असेल किंवा कोणाची जागा बळकावली गेली असेल, तर त्यांनी न घाबरता तात्काळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पवई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news