Sex trafficking rescue : सेक्स रॅकेटप्रकरणी तीन विदेशी महिलांची सुटका

अंधेरीतील हॉटेल मालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा
Sex trafficking rescue
सेक्स रॅकेटप्रकरणी तीन विदेशी महिलांची सुटकाPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, बालाजी बिजनेस पार्कमध्ये एक हॉटेल असून या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी तिथे एका बोगस ग्राहकाला शहानिशा करण्यासाठी पाठवले होते. ठरल्याप्रमाणे हा बोगस ग्राहक हॉटेलमध्ये गेला. तिथे त्याची भेट मॅनेजर आलम चौधरीशी झाली. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्याने त्याला सहा हजार रुपये दिले. त्यानंतर त्याला आठव्या मजल्यावरील एका रुममध्ये पाठविले.

तिथे एक विदेशी महिला होती. ग्राहकाकडून पोलिसांना सिग्नल प्राप्त होताच या पथकाने तिथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दोन रुममधून तीन विदेशी महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीत तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले.

अब्दुल सलाम व आलम चौधरी हे दोघेही त्यांच्याकडे काही ग्राहक आणत होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत नंतर आलम चौधरीला पोलिसांनी अटक केली. सुटका केल्यांनतर महिलांना मेडीकलसाठी पाठविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news