

मुंबई : आज रात्री मुंबईत होणाऱ्या नववर्ष स्वागत सोहळ्यांच्या निमित्ताने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ आणि आरे ते कफ परेड मेट्रो ३ मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मेट्रो ३ भुयारी मार्गिका रात्रभर सुरू राहणार आहे.
भुयारी मेट्रो सकाळी ५.५५ ते रात्री १०.३०पर्यंत चालवली जाते. आज ३१ डिसेंबरनिमित्त विशेष सेवा रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. ही सेवा १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध होणार आहे.
मेट्रो १ मार्गिकेवर दररोज नियमितपणे ४७६ फेऱ्या चालवल्या जातात. आज अतिरिक्त २८ फेऱ्या चालवल्या जातील. म्हणजेच ३१ डिसेंबरनिमित्त ५०४ फेऱ्या चालवल्या जातील. गर्दीच्या वेळेत दर ३ मिनिटे २० सेकंदांनी व कमी गर्दीच्या वेळेस दर ५ मिनिटे ५५ सेकंदांनी मेट्रोच्या नियमित फेऱ्या चालवल्या जातात. आज चालवण्यात येणाऱ्या अतिरिक्त २८ फेऱ्या दर १२ मिनिटांनी चालवल्या जातील. मेट्रो १ मार्गिकवरील पहिली मेट्रो वर्सोव्यावरून सकाळी ५.३० वाजता सुटेल. त्याचवेळी घाटकोपरवरूनही मेट्रो सुटेल. मध्यरात्रीनंतर २.१४ वाजता वर्सोव्यावरून शेवटची मेट्रो सुटेल. तसेच २.४० वाजता घाटकोपरवरून शेवटची मेट्रो सुटेल.
रेल्वे सेवा राहणार सुरू
नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरता मुंबईत येणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने मध्यरात्रीच्या प्रवासाची सोय केली आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रात्री १.३० वाजता विशेष लोकल धावणार आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रात्री १.३० वाजता असणार आहे. तर चर्चगेट ते विरारसाठी रात्री १.१५ वा., २ वा., २.३० वा., ३.२५ वाजता. विरार ते चर्चगेट- रात्री १२.१४ वा., १२.४५ वा., १.४० वा., ३.०५ वाजता विशेष लोकल धावणार आहेत. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल लोकल ०१. ३० वाजता धावणार आहे.
दि. ३१ डिसेंबर रोजी नवी मुंबई मेट्रोही रात्री दिडपर्यंत धावणार
नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधरदरम्यान बुधवार, दि. ३१ डिसेंबर ते गुरुवार ०१ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री ०१.३० वाजेपर्यंत चालविण्यात येणार आहे. या कालावधी दरम्यान बेलापूर व पेंधर टर्मिनल येथून दर २० मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. शेवटची मेट्रो बेलापूरहून मध्य ०१.०० वाजता रवाना होईल. रात्री ०१.३० वाजता तर पेंधर येथून मध्य रात्री