मुंबई : रिक्षात विसरलेल्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी परत मिळवून दिली

पोलिस विभागाचे कौतुकास्पद कार्य
The police recovered the bag of jewelery left in the rickshaw
रिक्षात विसरलेल्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी परत मिळवून दिलीFile Photo
Published on
Updated on

कांदिवली येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर रिक्षात विसलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम काही तासांत समतानगर वाहतूक पोलीस चौकीच्या अंमलदार संगीता चव्हाण यांनी परत मिळवून दिले. या कामगिरीबाबत संगीता चव्हाण यांचे या डॉक्टर महिलेने आभार व्यक्त केले तर वरिष्ठांकडून या कामगिरीबाबत कौतुक होत आहे.

The police recovered the bag of jewelery left in the rickshaw
गोवा : मृत पोलिस कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना ३० लाखांची मदत आणि नोकरी मिळणार

मानसी सावंत या डॉक्टर असून त्या रविवारी दुपारी कांदिवली येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. येताना त्या त्यांची एक बॅग रिक्षात विसरल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार संगीता चव्हाण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी विकास राठोड यांना सांगितला.

The police recovered the bag of jewelery left in the rickshaw
नेपाळ : त्रिशूली नदीत भूस्खलनाने २ बस वाहून गेल्या, ६५ बेपत्ता; शोध कार्य सुरु

या दोघांनी कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक रिक्षाची तपासणी सुरु केली. त्यावेळी एका रिक्षात मानसी सावंत यांचे दागिने आणि कॅश असलेली बॅग सापडली. ही बॅग नंतर मानसी सावंत यांना परत देण्यात आली. रिक्षात विसरलेला मुद्देमाल काही तासांत संगीता चव्हाण आणि विकास राठोड यांनी पुन्हा परत मिळवून दिल्याबद्दल तिने त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच या कामगिरीबाबत सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त नितेश गठ्ठे, प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश भोपाळे व त्यांच्या सहकार्‍यांनी संगीता चव्हाण आणि विकास राठोड यांचे कौतुक केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news