

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील चर्मकार, मातंग या अनुसूचित जाती उप वर्गीकरणाचे समर्थन, स्वागत करत असल्या तरी त्यांच्यासाठी तो आत्मघात आहे, असे प्रतिपादन चर्मकार नेते अच्युत भोईटे यांनी मुंबईत झालेल्या उपवर्गीकरण परिषदेत बोलताना केले.
महाराष्ट्र विधानसभेत २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीसाठी २९ जागा राखीव आहेत, असे सांगून ते म्हणाले की, २९ पैकी चर्मकार समाजाचे सध्या ११ आमदार आहेत. लोकसंख्येच्या १.३ टक्क्याप्रमाणे उपवर्गीकरण झाल्यास त्यांच्या आमदारांची संख्या ३ पर्यंत घसरेल. मातंग समाजाचे सध्या चार आमदार आहेतच. उपवर्गीकरणात लोकसंख्येच्या २.३४ टक्क्याप्रमाणे त्यांचे पाच आमदार होतील. म्हणजे एक मातंग आमदार वाढेल. उर्वरित ५६ जातींचे सध्या सहा आमदार आहेत. त्यात बुरडः २, बलाई : १, खाटीक १, वाल्मिकी १, कैकाडी : १ आहे. लोकसंख्येच्या १.५६ टक्क्याप्रमाणे उपवर्गीकरण झाल्यावर त्यांच्या आमदारांची संख्या तीन इतकी होईल, असा अंदाज भोईटे यांनी व्यक्त केला.