नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील विरार भागामध्ये संरक्षक उपकरणाविना सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची स्वच्छता करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला जाब विचारला आहे. मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र राज्य सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यात या संदर्भातील उत्तर मागितले आहे.