The craze for pharmacy degree admissions has subsided.
मुंबई : पुढारी वृत्तसेवा औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या चार फेऱ्य़ा संपल्या असून प्रवेशाच्या तब्बल 14 हजारांवर जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 ते 10 नोव्हेंबरदरम्यान चौथी प्रवेश फेरी राबविण्यात येत असून संस्थात्मक फेरी 11 ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे.
प्रवेशाची एकच फेरी शिल्लक असताना प्रवेशाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे कोरोना काळात वाढलेली फार्मसी प्रवेशाची क्रेझ आता कमी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.पदवीच्या केंद्रीभूत प्रवेशासाठी 44 हजार 287 जागांसाठी राज्यभरातून 55 हजार 116 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
त्यातील 38 हजार 462 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला होता. पहिल्या फेरीमध्ये 16 हजार 604 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीत 8 हजार 80 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तिसऱ्य़ा फेरीत 3 हजार 578 विद्यार्थ्यांनी तर चौथ्या फेरीत 3 हजार 633 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशाच्या अद्यापही 14 हजार 455 जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.