ठाणे : पुष्पक एक्सप्रेस मध्ये दरोडा, महिलेवर बलात्कार

ठाणे : पुष्पक एक्सप्रेस मध्ये दरोडा, महिलेवर बलात्कार
Published on
Updated on

ठाणे ; पुढारी वृत्‍तसेवा : इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लूट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना (शुक्रवार) सायंकाळी इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली.

दोन आरोपींना प्रवशांनी  पकडलं

या घटनेनंतर कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले, मात्र याच दरम्यान दोन आरोपींना प्रवशांनी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत चार जणांना अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात, तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना, आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले. एक्स्प्रेसने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली

.हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

16 प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले

या प्रकारातून 16 प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले. त्यांच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. दरोडेखोर इथेच थांबले नाहीत तर त्यांनी पती सोबत प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाश्यांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले.ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख अस या आरोपींच नाव आहे.

हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या अमलाखालु त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली

विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे. या प्रकरणी मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची तब्येत स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहेत, तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news