Thackeray Mumbai Rally | मोर्चा ठाकरेंचा अन्‌ चर्चा बॅनर, पोस्‍टरची!

Thackeray Mumbai Rally |
Thackeray Mumbai Rally | मोर्चा ठाकरेंचा अन्‌ चर्चा बॅनर, पोस्‍टरची!
Published on
Updated on

मुंबई : नवी दिल्‍लीतील विद्यार्थ्यांच्‍या आंदोलनाला आलेल्‍या यशाच्‍या जल्‍लोषासाठी मुंबईत उद्धव व राज या ठाकरे बंधूंनी काढलेल्‍या भव्‍य रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला खरा; मात्र या रॅलीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते बॅनर व पोस्‍टरने. यातील बॅनर होते तुकाराम मुंढे यांच्‍या छायाचित्राचे तर पोस्‍टर होते चिमुकलीने हाती घेतलेल्‍या ‘पोलिस काका मला मारू नका’ या विनंतीचे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्‍हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली. भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील या कारवाईच्‍या माध्‍यमातून मुंढे यांच्‍या विभागाने अनेक कंपन्यांतील भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करीत नियमभंगाची कारवाई केली. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्‍यभरात 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहीम राबवली जात आहे. याच धाडसी व पारदर्शक कामामुळे मुंढे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले असून मोर्चात त्यांच्या समर्थनाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पोलिस काका, मला मारू नका...

याच रॅलीत एक चिमुकली हातात ‘पोलिस काका मला मारू नका. मीही उद्या भारताचा पंतप्रधान होऊ शकते. माझं वय फक्‍त कमी आहे. पण माझी शैक्षणिक पात्रता तीच आहे, जी भारताचा पंतप्रधान होण्‍यासाठी लागते, चौथी पास...’ असे पोस्‍टर होते. ठाकरे बंधूंच्‍या रॅलीत सहभागी असलेल्‍यांचा जल्‍लोष सुरू असताना हे बॅनर आणि पोस्‍टर मात्र प्रत्‍येकाचे लक्ष वेधून घेत होेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news