Dadar Best Bus Accident : दादरच्या प्लाझा येथे टेम्पोने बेस्ट बसला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर ४ जण जखमी

प्लाझा सिनेमा जवळ टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेला टेम्पो चालकाने बेस्ट बसला जोरदार धडक दिली.
Dadar Best Bus Accident
Dadar Best Bus AccidentPudhari Image
Published on
Updated on

Dadar Best Bus Accident :

दादरच्या प्लाझा येथे टेम्पोने बेस्टबसला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहे. रविवारी रात्री वरळी डेपोहून प्रतिक्षानगरला जात असताना, प्लाझा सिनेमा जवळ टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेला टेम्पो चालकाने बेस्ट बसला जोरदार धडक दिली. पुढे जाऊन टेम्पो ट्रॅव्हलरने १ टॅक्सी आणि १ कारलाही धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की पुढे बेस्ट बसने पुढे बेस्टस्टाॅपवर उभे असलेल्या प्रवाशांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले, यात शाहबुद्दीन नावाचा ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला जखमींमध्ये असून ३ पुरूष आणि १ महिलेचा समावेश आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dadar Best Bus Accident
Raj-Uddhav Thackeray: राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर

बेस्ट बस वरळी डेपोहून प्रतीक्षा नगरला जात असताना हा अपघात झाला. हा अपघात ज्या दादर परिसरामध्ये जो प्लाझा सिनेमा आहे, त्याच्या समोरच्या बस स्टॉपवर घडला. अपघाताच्या वेळी साधारणपणे काल सव्वा एक वाजताची होती.

या धडकेमुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले. टेम्पोची बेस्ट बससह टॅक्सी आणि कारलाही धडक बसली. हा अपघात इतका मोठा होता की संपूर्ण बेस्ट बस ही पुढे ढकलली गेली.

अपघात रात्री सव्वा एक वाजता झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, कारण तेव्हा जर जास्त लोक असते तर खूप मोठी दुर्घटना झाली असती.

Dadar Best Bus Accident
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार; आदिती तटकरेंचं आश्वासन

जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेला 'ट्रॅव्लर' आणि दुसरी गाडी सध्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news