Bhandup Crime: भांडुपमध्ये धक्कादायक घटना! आईसोबत चॅटिंग करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Bhandup Crime
Bhandup CrimePudhari
Published on
Updated on

मुंबई: भांडुप येथे रोहित संजय झनके या 24 वर्षांच्या तरुणावर अल्पवयीन मुलाने कोयत्याने हल्ला केला असून जखमी रोहितवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सतरा वर्षांच्या मुलाला कांजूरमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले आहे. त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आईसोबत चॅटिंग करतो म्हणून त्याने मित्रावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रोहित आणि सतरा वर्षांचा आरोपी भांडुप गावच्या एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या पाच वर्षांपासून परिचित आहे. त्यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते.

Bhandup Crime
Water Cut: 28 मेपासून सिडको नोडमध्येही 10 टक्के पाणीकपात लागू; पाणीचिंता वाढली

रोहितकडे त्याच्या आईचा मोबाईल क्रमांक होता. तो अनेकदा तिच्याशी बोलत होता, चॅटिंग करत होता. अलीकडेच ही माहिती आरोपी मुलाला समजताच त्याने त्याला बघून घेण्याची धमकी देत त्याने आईला मारहाणही केली होती.

रविवारी 24 मेला रोहीत हा भांडुप गाव येथील एम. डी केणी मार्ग, भीमज्योत मंडळासमोरील तथागत बुद्ध विहारजवळून जात होता. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता.

त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल केले होते. ही माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोहितची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.

Bhandup Crime
Pimple Nilakh Flyover Issue: पिंपळे निलख उड्डाण पुलाचा तीव्र उतार ठरतोय धोकादायक; अपघातांनंतर सुरक्षितता ऑडिट होणार

त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या आरोपीला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news