.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या आई अंजनाबाई पुंडलिकराव लहाने (८८) यांचे आज निधन झाले. अंजनाबाई यांनी डॉ. तात्याराव लहाने यांना २२ फेब्रुवारी १९९५ला स्वतःची एक किडनी देऊन जीवदान दिले होते. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या शरीराचा एक अंश नेहमीच आमच्यासोबत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया लहाने कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी अंजनाबाई पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या खुब्याला आणि खांद्याला दुखापत झाली होती. त्यातच त्यांचे आज सकाळी निधन झाले. आईच्या शिवाय आम्हाला राहावे लागणार आहे, हा आमच्यासाठी कठीण काळ असेल, असे डॉ. लहाने यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
लहाने कुटुंब हे मुळचे लातूर जिल्ह्यातील मकेगवा येथील आहेत. १९९४ला डॉ. लहाने यांना किडनीचा आजार बळावला. त्यांना दर आठवड्याला डायलेसिस करावे लागत होते. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना स्वतःची एक किडनी दिली होती. माई माय अंजनाबाईने स्वतःची किडनी देऊन मला दुसरा जन्म दिला, माईच्या दातृत्वाने प्रेरणा घेत मी समाजासाठी काम केले, असे डॉ. लहाने यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.