Tatkare vs Rohit Pawar | तटकरे - रोहित पवार वाद पेटला

Tatkare vs Rohit Pawar |
Tatkare vs Rohit Pawar | तटकरे - रोहित पवार वाद पेटला
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या विजयानंतर महाविकास आघाडीकडून होत असलेल्या 'घोडेबाजार'च्या आरोपांचा सुनील तटकरेंनी समाचार घेतला. ते म्हणाले, या पराभवामुळे विरोधकांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. म्हणूनच ते आता घोडेबाजार झाल्याचे रडगाणे गात आहेत. लोकशाहीत निकाल लागल्यानंतर निदान समोरच्या उमेदवाराचे अभिनंदन करायची संस्कृती तरी विरोधकांनी शिकावी, असा टोला तटकरे यांनी लागवला.

रोहित पवारांनी माझ्या घराण्यावर बोलू नये. तुम्ही कोणाला सोबत घेऊन 'वर्षा' बंगल्याचे उंबरठे झिजवत होता, याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे, असे ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जत-जामखेडमधून आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही कोणाकोणाचे पाय धरले, कुणासोबत जाऊन वर्षा बंगल्याचे उंबरठे झिजवले, याचीही सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे उगीच आपल्यालाच जास्त राजकारण कळते, असा आव आणू नका, असा इशारा तटकरे यांनी दिला.

फुकटचे सल्ले नकोत

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर रोहित पवारांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळावी, असा सल्ला दिला होता. त्यावर तटकरेंनी स्पष्ट केले की, आमच्या पक्षात कोणी बाहेरच्याने सल्ला देण्याची गरज नाही. नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवण्याचा पक्षाचा कोणताही विचार नाही. छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news