'ड्रंक अँड ड्राईव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाया करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई मनपा, पोलीस आयुक्तांना सूचना
Take strict action to prevent 'drunk and drive': Chief Minister Eknath Shinde
'ड्रंक अँड ड्राईव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाया करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे File Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिल्‍या आहेत. यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.

Take strict action to prevent 'drunk and drive': Chief Minister Eknath Shinde
Mumbai Rains : गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तापासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी.

Take strict action to prevent 'drunk and drive': Chief Minister Eknath Shinde
Weather Forecast | ठाणे, मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार

पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदुषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

Take strict action to prevent 'drunk and drive': Chief Minister Eknath Shinde
किल्ले रायगडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका; गडावर २१ जुलैपर्यंत प्रवेश बंद...

मद्य सेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षीतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news