New Mumbai Mayor | नवी मुंबई महापालिकेच्या महापौर पदी सुजाता पाटील तर उपमहापौर पदावर दशरथ भगत बिनविरोध

Sujata Patil Navi Mumbai | या निवडणुकीत भाजप 65, शिंदेच्या शिवसेनेचे 42, मनसे 1, शिवसेना (उबाठा) 2, अपक्ष 1 असे 111 नगरसेवक निवडून आले आहेत
New Mumbai Mayor Sujata Patil
New Mumbai Mayor Sujata Patil
Published on
Updated on

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका महापौर निवडणूकीत शिंदेच्या शिवसेनेने अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या सुजाता पाटील यांची महापौर पदावर तर दशरथ भगत यांची उपमहापौर पदावर बिनविरोध निवड झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीने दिली गेल्या सभागृहात घोषणा दिल्या. या निवडीनंतर महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्विकारला.

एप्रिल 2015 ते 7 मे 2020 पर्यंत महापालिका अस्तित्वात होती. नवी महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपली आणि त्यानंतर पाच वर्ष प्रशासक होते. अभिजित बांगर, राजेश नार्वेकर, कैलास शिंदे यांनी प्रशासक म्हणून कारभार सांभाळला. 7 मे 2020 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून नवी महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होती. नुकतीच महापालिकेची निवडणुक पार पडली.

या निवडणुकीत भाजप 65 शिंदेच्या शिवसेनेचे 42, मनसे 1, शिवसेना (उबाठा) 2, अपक्ष 1 असे 111 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर 6 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली. भाजपने 65 नगरसेवक निवडून आणले असून एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ 66 वर गेले आहे. दरम्यान, अखेपर्यंत निवडणुकीत शिवसेने आणि भाजपची युती झाली नाही. यामुळे स्वतंत्रपणे निवडणुक लढविली आणि भाजपने बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षाची प्रशासकीय राजवट आज गुरुवारी संपुष्टात आली.

नवी महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत भाजप पक्षाच्या सुजाता सुरज पाटील पाटील यांची महापौर पदी तर, भाजपचे दशरथ भगत यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली. या सभेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी रणजीत यादव यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर, संघरत्ना खिल्लारे यांनी सचिव म्हणून काम केले.

या निवडीमुळे 5 वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. नवी महापालिकेच्या पाचव्या मजल्यावरील सभागृहात विशेष सभा पार पडली. भाजप पक्षाच्या नगरसेविका सुजाता पाटील यांची महापौरपदी तर, भाजपचे नगरसेवक दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महापौर आणि उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्विकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news