CET 2025 | सीईटीचा अर्ज भरतानाच कागदपत्रांची माहिती

प्रवेशातील अडथळे कमी करण्यासाठी उपाययोजना
CET, Entrance Exam
सीईटीचा अर्ज भरतानाच कागदपत्रांची माहितीFile Photo
Published on
Updated on

मुंबई : सीईटीनंतर ज्यावेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाची वेळ येते त्यावेळी प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांना अडचणी येवू नयेत म्हणून आता प्रवेशपूर्व परीक्षांच्या नोंदणीवेळीच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, तसेच त्याचा नमुना कसा असेल, याची माहिती सीईटी सेलकडून प्रवेशपरीक्षेचे अर्ज भरतानाच संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यासाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा फॉर्म्युला दिला जाणार आहे

सीईटी सेलमार्फत दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. मात्र, अनेकदा प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची विद्यार्थ्यांना माहिती नसते. तसेच विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र काढतात. मात्र, जात वैधता किंवा नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र लागते, याची माहिती त्यांना नसते. त्यातून ऐनवेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कमी कालावधीत कागदपत्रे मिळवावी लागतात. कागदपत्रे मिळाली नाही तर अनेकांना त्यांच्यावर खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची वेळ येते. तसेच सीईटी सेललाही विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागते, अशा परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान देखील सहन करावे लागते. त्याची काळजी घेऊन सीईटी सेलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

संकेतस्थळावर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारा रकाना असणार आहे. त्यात आवश्यक प्रमाणपत्रांची माहिती दिसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी होणारी धावपळ कमी होईल. विद्यार्थ्यांकडे प्रवेशावेळी एखादे कागदपत्र नसते. त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या गोष्टी लक्षात घेता त्या प्रवेशपरीक्षेचे अर्ज भरतानाच प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी संकेतस्थळावर बदल केले आहेत. यामुळे विद्यार्थी आतापासूनच कागदपत्रे मिळवण्याची तयारी करतील. त्यातून प्रवेश प्रक्रियेवेळी त्यांच्यावर ताण येणार नाही, शिवाय प्रवेशप्रक्रियाही सुरळीत पार पडेल, असेही सीईटीकडून सांगण्यात आले आहे.

नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यावर विद्यार्थ्यांसमोर आवश्यक कागदपत्रांचा रकानाच येणार आहे. यामध्ये प्रवर्गनिहाय आवश्यक कागदपत्रे, तसेच त्या प्रमाणपत्रांसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाचा नमूना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रांची माहिती व अर्ज करावयाचा नमूना हा विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यायची सुविधाही देण्यात आली आहे.

-दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news