

सोलापूर : विजय थोरात
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एस. टी. गाड्यांची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. गत साडेपाच वर्षांत राज्यात एस. टी.चे एकूण 14 हजार 672 अपघात झाले आहेत. यात एक हजार 784 जणांचा मृत्यू झाला, तर 18 हजार 556 जण जखमी झाले आहेत.