

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ राज्य मंत्रिमंडळाने आज (दि. १४) झालेल्या बैठकीत महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे नामकरण करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची दिली. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे.