

मुंबई : एस.टी. कर्मचार्यांना शुक्रवारी दिवाळी भेट रक्कम मिळणार आहे. तथापि, ही रक्कम देण्यासाठी सरकारने नकार दिल्याने एस.टी. महामंडळ स्वतःच्या उत्पन्नातून हा खर्च करणार आहे.
एस.टी. कर्मचार्यांना मिळणारी यावर्षीची दिवाळी भेट रक्कम आचारसंहितेचा अडथळा आल्याने रखडली होती. सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट 6,000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी एस.टी. प्रशासनाने 52 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. मात्र, सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगितले गेले. आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम तातडीने दिली जावी, असे सरकारला एस.टी. प्रशासनाकडून कळविण्यात आले. मात्र, सरकार ही रक्कम एस.टी.ला देणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.