

पोखरापुर : मलिकपेठ येथील दुचाकी चालक नरखेड रस्त्याकडे वळत असताना मोहोळ कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.५ ,रोजी दु.२:४० वाजणाच्या सुमारास घडली. लक्ष्मण कृष्णा ढवळे वय ७२ रा.मलिकपेठ ता.मोहोळ असे मयताचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नेताजी लक्ष्मण ढवळे वय ४० रा. मलिकपेठ ता. मोहोळ यांचे वडील लक्ष्मण कृष्णा ढवळे हे दूचाकी क्र.एम.एच.१३/सी. डब्लयू ०४८१ वरून दि.५ डिसेंबर रोजी मोहोळ येथून बाजार करून येतो. सांगून गेले होते. मोहोळ येथील नरखेड ब्रीज खालून वळत असताना त्यांना पाठीमागून मोहोळ ते पुणेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कार क्रमांक एम.एच.०१/ए.व्ही.०५६२ ने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.त्याच कारमधून त्यांना पुढील उपचारासाठी मोहोळ येथे नेले होते. याठिकाणी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारचालक फरार झाला आहे. याप्रकरणी नेताजी ढवळे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.