Solar Project: एसएनडीटीच्या चर्चगेट कॅम्पसमध्ये सौरऊर्जा प्रकल्प; 180 केव्ही क्षमतेच्या प्रकल्पाने उजळणार विद्यापीठाचा कॅम्पस

प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम होत आहे.
Solar
SolarPudhari
Published on
Updated on

मुंबई: दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या जुहू परिसरातील विजेची गरज सौरऊर्जेच्या वापरातून भागवण्यास सुरुवात केल्यावर आता विद्यापीठाचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट संकुलातील तीनही इमारतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम होत आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलात तीन इमारती आहेत. यात प्रशासकीय मुख्य इमारत, लेडी पाटकर सभागृहाची इमारत आणि ॲनेक्स इमारत अशा तीन इमारतींमध्ये मिळून मासिक 180 किलोवॅटच्या आसपास विजेची गरज असते.

Solar
Ajit Pawar death case: अजित पवारांच्या मृत्यूच्या 6 दिवस आधी खरातने बदलले तब्बल 5 मोबाईल; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

या इमारतीत एसएनडीटी महिला महाविद्यालयासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे कार्य चालते. लेडी पाटकर सभागृहात विविध कार्यक्रम होत असल्याने या इमारतीची विजेची मागणीही मोठी असते.

या वीज पुरवठ्यावर होणारा खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आणि भविष्यात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत स्वत:च्या गरजेपुरती वीज स्वत:च उत्पादन करण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाने आता चर्चगेट संकुलातही सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.

Solar
IIT Bombay placements 2026: आयआयटी कॅम्पसमध्ये सरासरी वेतन 26.45 लाखांवर

महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीची विजेची मासिक गरज 50 केव्ही एवढी आहे. लेडी पाटकर सभागृहाच्या इमारतीसाठी 70 केव्ही आणि ॲनेक्स इमारतीसाठी 60 केव्ही वीज लागते. या गरजेचा विचार करून संबंधित प्रकल्प हाती घेतल्याचे विद्यापीठाचे साईट अभियंता केशव मस्के यांनी सांगितले.

सदर प्रकल्प सेव्हन ग्रील सोलार सिस्टिम या कंपनीतर्फे राबवला जात असून त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आली आहे. याबाबतच्या निविदा मागवून मगच संबंधित कंपनीला हे काम देण्यात आले असून यात विद्यापीठाचे अभियंता आशीष कांबळे यांचेही मोलाचे योगदान असल्याचे मस्के यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news