दक्षिण मुंबईतील 'या' चार मतदार संघांत तिरंगी लढतीची चिन्हे

मुंबादेवीत मविला विजयाची खात्री
Maharashtra Politics
Legislative Council ElectionsFile Photo
Published on
Updated on

नरेश कदम (दक्षिण मुंबई) 

लोकसभा मतदार संघातील सहापैकी चार विधानसभा मतदार संघात तिरंगी लढती होण्याची शक्यता असून, मलबार हिल व मुंबादेवी या दोन मतदार संघात विद्यमान आमदारांसाठी ही एकतर्फी लढत ठरण्याची शक्यता आहे. मलबार हिलमध्ये महायुती आणि मुंबादेवीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात असून, उर्वरित चार मतदार संघात मराठी मतांचे विभाजन निर्णायक ठरणार आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात मुंबादेवी, चण्डी, कुलाबा, भायखळा, शिवडी व मलबार हिल या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. यातील मलवार हिल, कुलाबा आणि गायखळा हे सध्या महायुतीकडे, तर मुंबादेवी, वरळी आणि शिवडी हे महाविकास आघाडीकडे आहेत. (Maharashtra Politics)

मुंबादेवीत मविला विजयाची खात्री

काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला माणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवी या मतदार संघात याही वेळी काँग्रेसची स्थिती भक्कम असून, येथे विद्यमान आमदार अमीन पटेल यांचा सलग चौथ्यांदा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे या मतदार संघातून उमेदवारी कुणाला द्यायची, हा महायुतीसाठी एक प्रश्न आहे. या मतदार संघात ५० टक्क्यांहून अधिक मतदार हे मुस्लिम असल्याने मुस्लिम मतदारच येथील आमदार ठरवतात.

२०१९ ला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतापेक्षा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा १८ हजार ५१७ महे अधिक मिळाल्याने पटेल यांची स्थिती मजबूत मानली जात आहे.

कुलाब्यात महायुती सेफ झोनमध्ये

कुलाबा विधानसभा मतदार संघात भाजप, काँग्रेस आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या यामिनी जाधव यांना कुलाबा मतदार संघात ९ हजार ९४ इतके मताधिक्य मिळाले. त्यामुळे विद्यमान आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहल नार्वेकर हे सध्या तरी सेफ झोनमध्ये असल्याचे मानले जात आहे

महाविकास आपाडीत ही जागा काँग्रेस की ठाकरे गट यापैकी कोणाच्या वाट्याला जाते, हे महत्वाचे आहे, या जागेवर काँग्रेसने दावा केला असून, पुन्हा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. जगताप यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक कुलाबा मतदार संघातून लढवली होती. नार्वेकर यांच्याशी त्यांचा सामना झाला होता. पावेळीही कुलाबा मतदार संघात नार्वेकर विरुद्ध जगताप अशी पुन्हा लदत होईल, असे दिसते. ताकरे गटाचे माजी आमदार अशोक धावक हेही फुलावा मतदार संघातून इच्छुक आहेत. मात्र दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संपातील भायखळ्या, वरळी आणि शिवडी या जागांवर ठाकरे गटाचादावा आहे. त्यामुळे कुलाब्याची जागा वॉग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. दलित, मुस्लिम, मराती, ख्रिश्चन आदी मतदार गढ़ाविकास आघाडीच्या बाजूने जातील, असे दिसत आहे.

या मतदार संघात कोळी मतदारांची भूमिका महत्वाची आहे. कुलाब्यात मनसेची ही १५ हजार मते आहेत. त्यामुळे मनसेचा उमेदवार रिंगणात असेल. त्यामुळे मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता असून, हे आमाडीच्या उमेदवारास धोकादायक ठरू शकेल.

शिवडी-तिरंगी लढतीत मराठी मतांच्या विभाजनावा धोका

एकेकाळी मराठी माणसाचा बालेकिल्ला असलेला शिवडी मतदार संघ यावेळीही आपल्या ताब्यात ठेवण्याचे आव्हान शिवसेना (ताकरे) गढापुढे आहे. मनसेनेही येथून निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने शिवसेना-मनसेच्या भांडणात मराठी मतांचे विभाजन होऊन महायुतीचा लाभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुतीत ही जागा कोण लढेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवडीत ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आमदार आहेत. त्यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. मराठी माणसाचा गड समजला जाणाऱ्या या मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे अविंद सावंत यांना फेवळ १६ हजार ९०३ इतके मताधिक्य मिळाले. एवढेच नव्हे तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चौधरी यांनी मिळालेल्या मतपिक्षा १ हजार ६२४ इतकी कमी मतेही या मतदार संघात शिवसेना (ठाकरे) गटाच्या उमेदवाराला पडली,

शिवसेनेत अनेकवेळा फूट पडली; पण परळ- लालबागचा शिवर्तनिक पक्षाशी एकनिष्ठ राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणूस चाळीमधील रूम विकून बदलापूर-अंबरनाथकडे स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे था मतदार संघावरील ठाकरे गटाची पकड सैल पडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले माहीत, या निकषावर चौधरी यांना तिकीट दिले जाईल; पण शिवडीत ठाकरे गटात सर्वकाही आलबेल नाही.

ठाकरे गटाने विभाग संघटक सुधीर साळवी हेसुद्धा येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव आहेत. साळवी यांना उमेदवारी द्यावी, यासाठी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यासह संघटनेतील काही पदाधिका-यांचा आग्रह आहे. सावंत आणि चौधरी यांच्यात सुप्त बाद आहे. त्यामुळे सध्या शिवडीत ठाकरे गटात बोन गट पढले आहेत. चौधरी यांच्या विरोधात मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे निवडणूक रिंगणात उतरते आहेत. नांदगावकर यांनी मध्ये तत्कालीन आमदार दगडू सकपाळ २००९ यांचा संगटन पराभव केला होता.

मनसेचे शिवडीत नसताना शिवसेनेतील गटबाजीचा फायदा घेऊन तेव्हा ते जिंकले होते. याहीवेळेस ठाकरे गठातील नाराजीचा फायदा नांदगावकर यांना होऊ शकतो. तसेच तिकीट मिळाले नाही तर सुधीर साळवी काय भूमिका चेतात, हेही महत्त्वाचे ठरेल. जा महायुतीने उमेदवार दिला नाही, तर महायुतीची मते नांदगावकर यांच्याकडे वळू शकतात, तसेच टॉवरांमबील अमराठी मतदार हे भाजपला मानणारे आहेत. ते निर्णायक ठरू शकतील. येथे मराठी तसेच गुजराती, जैन व मारवाडी ही मते निर्णायक ठरणार आहेत. पण महायुतीतून शिंदे गटाने उमेदवार उभा केला, तर मात्र अजय चौधरी यांगा विजयाची इं‌ट्रिक करण्याची संधी मिळू शकेल.

वरळीत कमी मताधिक्यामुळे ठाकरेंसमोर विजयाचे आव्हान

वरळी विधानसभा मतदार संघातील लढत ही आगामी विधानसभा निवडणुकीत देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरेल. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी महायुती राजकीय कसब व ताकद पणाला लावेल, असे चित्र आहे. ठाकरे यांच्या विरोधात सरळ लढत होणार की तिरंगी लढत, यावर मतांची गणिते ठरतील. त्यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे अशी सरळ लढत होईल, असे सध्या तरी दिसत आहे.

महायुती मनसेच्या उमेदवाराच्या पाठीशी सारी शक्ती लावून आदित्य यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करू शकते. महायुती आणि मनसेत याबाबत एकवाक्यता झाली नाही, तर महायुतीकडून शिंदे गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जावू शकेल. पण सध्या तरी शिंदे गटाकडून कोणीही उमेदवार पुढे आलेला नाही. सुशांत शेलार यांचे नाच चर्चेत आले आहे. पण अजून कोणताही निर्णय शिंदे गटाचा झालेला नाही. जर शिंदे गटाने उमेदवार दिला, तर मराठी मत्तांची तिघांमध्ये कमी जास्त विभागणी होईल, तर मुस्लिम, दलित यांची मते ठाकरे यांना मिळतील. पण भाजपच्या गुजराती, जैन अशा मतांचा शिंदे गटाच्या उमेदवाराला लाभ मिळू शकतो.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मविआचे उमेदवार अरविंद सावंत यांना आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात अवधे साडेसहा हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे वांचा पराभव करणे शक्य आहे, असा विश्वास सत्तारूढ महायुतीच्या नेत्यांना वाटू लागला आहे, ठाकरे यांचा स्वतः चा या मतदार संघात कमी जनसंपर्क असल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. यामुळेच कमी मताधिक्य मिळाल्याचे सांगितले जाते. मनसेने ठाकरे यांच्या विरोधात माजी नगरसेवक संदीप देशपांडे हा तरुण चेहरा दिला आहे.

या मतदार संघात मराठी मते ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत, मुस्लिम आणि दलित १२ टक्के आहेत, तर गुजराती, जैन व अन्य अमराठी २० टक्क्यपिक्षा जास्त आहेत, या मतदार संघात उभे राहिलेले गगनचुंबी टॉवर बामुळे अमराठी मते बाढली आहेत आणि हीच मोठी डोकेदखी ठाकरे गटाची असेल, भाजपची व्होटबैंक ही ठाकरे यांच्यापासून दुरावली आहे.

मलबार हिलचे राजकारण भाजपच्या बाजूने

दक्षिण मुंबईत भाजपचे स्वतःचे स्थान आहे. मलबार हिलमधून १९९५ ते २०१९ या काळात सहा वेळा मंगलप्रभात लोढा हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात महायुतीला ३९ हजारांहून अधिक मतांचे मताधिक्य मिळाले आहे. या राजकीय यशामागे मतदार संघातील लोढा यांचा उत्तम जनसंपर्क हे सूत्र असल्याचे त्यांचे निकटवतीय सांगतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोढांनी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा ७० हजारापेक्षा अधिक मते मिळवली होती. आगामी निवडणूक ही लोढांसाठी सातव्यांदा आमदार होण्याची संधी असेल, विरोधात काँग्रेस मात्र जगाभार शोधण्याच्या प्रयत्नात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या हिरा देवासी यांनी लोढांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मतदार संघात सतत संपर्क ठेवत, आपले जाळे वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, लोढांच्या विरोधात कॉंग्रेस संघटनेची ताकद अपुरी पडते.

भायखळा : मविआसमोर बंडखोरीचे आव्हान

शिवसेना शिंदे गटाच्या भागखळ्याच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून, शिवसेना (ठाकरे) गटातर्फे माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांचे नाव निश्चित मानले जात आहे! कॉग्रेसकडून झिशान सय्यद है निवडणूक लढण्यस इच्छुक असून, तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष लदाण्याच्या तयारीत आहेत. या मतदार संघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत, उद्धव ठाकरे गट हा महाविकास आघाडीत समाविष्ट झाल्यानंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत मुंबईसह राज्यातील अल्पसंख्याकांचे प्राबल्य असलेल्या ज्या विधानसभा मतदार संघात धार्मिक नवीकरण झाले, त्यातील एक प्रमुख मतदारसंघ म्हणजे भायखळा,

भायखळा विधानसभा मतदारसंघात ४६ हजार ६६ मतांचे मताधिक्य मिळाले नसते, तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात पराभव पत्करावा लागला असता. ठाकरे गटाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या ओजळीत अल्पसंख्याकांनी भरभरून मते टाकली, महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव या स्वतः भायखळा विधानसभा मतदार संघातून २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर २० हजार २३ मताधिक्याने निवडून आल्या छोत्या, पण त्यांना २०१९ व्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली ५१ हजार १८० मतेही यावेळी राखता आली नाहीत. जाधव यांना विधानसभेपेक्षा ११ हजार कमी मते मिळाली. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक जाधव यांच्यासाठी अत्यंत अडत्तणीची आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले ४६ हजार ६६ मताधिक्य जाधव यांना तोडावे लागेल, या मतदार संघात ५० ठाक्यांहून अधिक मतदार मुस्लिम आहेत. त्यामुळे काँग्रेसचे निशान सय्यद येथे ठाकरे गटाच्या विरोधात बंडखोरी करू शकतात. कांग्रेस येथे सांगली पैटर्न राबवून सय्यद यांना मदतही करू शकते, यावेळी महायुतीच्या गामिनी जाधव, ठाकरे गटाचे जामसूतकर, कग्रेिसचे बंडखोर झिशान अहमद आणि एमआयएमचे उमेदवार व माजी आमदार वारीस पठाण अशी चौरंगी लढतयेथे वयायला मिळू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news