Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्यांचाच डल्ला

१८ कोटींचा घोटाळा; ४६ निलंबित, नऊ कर्मचारी गजाआड
Siddhivinayak Temple
Siddhivinayak Temple
Published on
Updated on

मुंबई : मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायकाची दानपेटीही मंदिरातील कर्मचाऱ्यांनीच लुटल्याचे स्पष्ट झाले आहे. अपहाराची ही रक्कम १८ कोटी रुपये आहे. याप्रकरणी ४६ कर्मचाऱ्यांना श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने निलंबित केले; तर नऊ कर्मचाऱ्यांना अटक झाली. सध्या हे कर्मचारी जामिनावर सुटलेले आहेत.

गेल्या मार्चमध्येच श्री सिद्धिनायक मंदिरातील हा अंदाजे १८ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. मात्र ट्रस्टने त्‍याचा कोणताही बभ्रा होऊ दिला नाही. आपल्याच पातळीवर या प्रकरणाची चौकशी ट्रस्टने केली आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. श्री सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर हात मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल ५५ वर पोहोचल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्हीने फोडले बिंग

मार्च २०२६ मध्ये मंदिराच्या पुजारी कक्षातील दानपेटीतून १० हजार रुपयांची चोरी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झालेे. दानपेटीतील रक्कम काढण्यासाठी कर्मचारी राजेंद्र रामचंद्र पेंडुरकर बोटाच्या कात्रीचा वापर करत असल्याचे समोर आले. दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडीही सुनावली होती.

मंदिराच्या उत्पन्नावर डोळा!

२०२५-२६ या आर्थिक वर्षात गुंतवणुकीवरील व्याजातून ६२.५७ कोटी रुपये हा सर्वाधिक महसूल मिळाला. दानपेटीतून ३२.३५ कोटी रुपये, पूजा सेवांतून २४.२२ कोटी रुपये, देणग्यांतून २३.४२ कोटी रुपये, लाडू-नारळ विक्रीतून २२.१० कोटी रुपये, तर इतर स्रोतांतून १८.०२ कोटी रुपये जमा झाले. या उत्पन्नावर कर्मचाऱ्यांचा डोळा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news