मुंबई : गुरुपौर्णिमेला दीडपट वाढलेले फुलांचे भाव श्रावणातही वाढतील अशी शक्यता होती. मात्र, सध्या सरासरी ४० रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
श्रावण महिना असल्याने व्रत-वैकल्य, सत्यनारायण पूजा, सणवार यासाठी फुलांना मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने काही दिवसांपासून फुलांचे दर कमी झाले आहेत. झेंडू, मोगरा आणि गुलाबाला मागणी असल्याचे फूल विक्रेते न्यू उदय फ्लॉवर्स स्टॉलचे रोहिदास दुराफे यांनी सांगितले.
जास्वंदाची दहा फुले २० रुपये, धोतऱ्याची दहा फुले २० रुपये तर सोनचाफ्याची ५० फुले ६० रुपयांना मिळत आहे.
केळीचे खांब २५ रुपये पाच, तर गुलाबाची फुले ८० रुपयांना २० आहेत.
झेंडू: ४० रुपये
अस्टर : ४० रुपये
निशिगंधा : २०० रुपये
मोगरा : ६०० रुपये