Shiv Sena | शिवसेना ठाकरे गटाला सुधारित मशाल चिन्ह

चिन्हाच्या आकारात केला बदल
 Shiv Sena symbol
शिवसेना ठाकरे गटाला सुधारित मशाल चिन्हfile photo
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हात विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही बदल करून नव्या स्वरूपातील चिन्ह दिले आहे. नव्याने देण्यात आलेल्या चिन्हाचा वरचा आकार आता बॅटरीसारखी दिसणार आहे.

यापूर्वी तो आईस्क्रीमच्या कोनासारखा दिसत होता. वरच्या बाजूला ज्वाळा आणि खाली त्याला बॅटरीसारखा आकार असे बदल या चिन्हात करण्यात आले असून, या चिन्हाच्या आतील बाजूस असलेला भगवा रंगही काढण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. नव्या सुधारित चिन्हामध्ये बॅटरीचा आकार स्पष्टपणे दिसत आहे. आधी हे चिन्ह आईस्क्रीमच्या कोनासारखे दिसत असल्याची टीका झाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवरही हे नव्या स्वरूपातील निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पेटत्या मशालीचा आणि शिवसेनेचा फार पूर्वीपासूनचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने १९८५ मध्ये पेटत्या मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. नंतरच्या काळात रेल्वे इंजिन, ताडाच्या झाडाची जोडी, धनुष्यबाण आदी चिन्हे शिवसेनेला मिळत गेली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news