

मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सोमवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात तेरा उमेदवारांचा समावेश असून, कोल्हापूरमधील हातकणंगले आणि शिरोळ अशा दोन ठिकाणी मित्रपक्षांना पाठिंबा घोषित करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजपच्या शायना एनसी यांचे नाव शिवसेनेच्या तिसर्या यादीत आले आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेत्या शायना एनसी वरळी मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, शिवसेनेकडून वरळीत मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
शशिकांत खेडेकर - सिंदखेड राजा
हिकमत उढाण - घनसावंगी
संजना जाधव - कन्नड
राजेश मोरे - कल्याण ग्रामीण
अशोक पाटील - भांडुप पश्चिम
शायना एनसी - मुंबादेवी
अमोल खताळ - संगमनेर
मल्हारी कांबळे - श्रीरामपूर
विठ्ठल लंघे पाटील - नेवासा
अजित पिंगळे - धाराशिव
दिग्विजय बागल - करमाळा
राजेंद्र राऊत - बार्शी
राजेश बेंडल - गुहागर