शरद पवारांची धनंजय मुंडेंविरोधातही व्यूहरचना

आ. गुट्टे यांचे जावई शरद पवार गटात
Sharad Pawar on Dhananjay Munde
शरद पवारांची धनंजय मुंडेंविरोधातही व्यूहरचनाfile photo
Published on
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघाचे आमदार व अजित पवारांचे समर्थक असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात त्यांनी व्यूहरचना आखून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना खिंडीत पकडण्याची पवार यांनी सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार म्हणाले, काहीजण आमच्या नावाने निवडून आले; पण त्यानंतर भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले. या लोकांनी जनतेची फसवणूक केली. आज ते सत्तेत आहेत. मात्र, सत्ता कायमस्वरूपी नसते हे त्यांनी लक्षात घ्यावे. ही केवळ सुरुवात आहे. परळीत मी मोठी सभा घेईन. राज्यातील सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी मुंडे यांना इशारा दिला.

सत्ताबदल होणार

विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मतदान करण्याची मतदारांची तयारी नाही. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असल्यामुळे राज्यातही सत्ताबदल झालेला दिसेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news