

NCP Strategy on Municipal Election
मुंबई : महापालिका निवडणुकीबाबत आपली रणनीती काय असावी, याबाबत चर्चा करताना आम्ही ठरवले आहे. जिथे निवडणुका आहेत तिथल्या लोकांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. तिथे काय करता येईल, हे त्यांनी ठरवावे. मुंबई पालिकेला आपण सामोरे जात आहे. आपण स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असेल. तर त्या निर्णयाचा पाठीशी पक्ष असेल किंवा तुम्हाला वाटलं की आपण बसून इतरांशी चर्चा करायला हवी, तर त्याबाबत देखील पक्ष पाठीशी असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.१५) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.
पवार पुढे म्हणाले की, गेले तीन चार दिवस घसा ठीक नाही त्यामुळे माझ बोलण समजण्यामधे अंतर पडण्याची शक्यता आहे.. आज सगळ्यांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याची तयारी करण्यासाठी आजचे शिबिर आयोजित केले आहे. लोकसभा निवडणुका झाल्या एक वेगळी चिंता आपण पाहिली. महाराष्ट्रात आपल्याला लोकसभेला चांगल यश मिळाल. आपण १० ते ११ जागा लढलो परंतु २ जागा जिंकू शकलो नाही. आज देशाच्या संसदेत आपले खासदार आहेत ते एका विचाराने महाराष्ट्राबाबत चांगल्या पद्धतीने विषय मांडतात. लोकसभेला चांगलं यश मिळाल मात्र विधानसभेला तसं चित्र राहिलं नाही. निवडणुक यंत्रणेबाबत लोकांच्या मनात संशय आहे. राहुल गांधी यांनी एक लेख देखील त्याबाबत लिहिला होता. विधानसभा निकाल अस्वस्थ करणारा होता. मात्र पक्षाचा सामान्य कार्यकर्ता मजबूत आहे.
आज एका वेगळ्या परिस्थितून आपला देश जात आहे. अनेक मान्यवरांनी काय नीती असावी, याबाबत भूमिका मांडली आहे. आज वेगळे चित्र दिसत आहे. इस्त्राईल सारखा देश शेतात चांगले काम करत आहे. मात्र, दुसरीकडे गाझा मध्ये होत आहे, ते वाईट आहे. हे होतं असताना सगळे देश स्तब्ध झाले आहे. जगात अशा गोष्टी घडत असताना भारत आधी एक भूमिका घ्यायचा. आज देशाची सूत्रे ज्यांच्या हातात आहे, ते देशाची भूमिका कधी मांडत नाही.
मध्यंतरी काश्मीर मधे काही लोकांची हत्या झाली. हे घडलं त्यानंतर देश अस्वस्थ होता. त्यावेळी केंद्राची जबाबदारी होती मशीन गण घेऊन येणाऱ्याच्या विरोधात भूमिका घेणं अपेक्षित होते. काश्मिरी लोकांचे आभार मानतो. त्याठिकाणी स्पेशल अधिवेशन झालं आणि त्यांनी आपण सर्वांच्या सोबत आहोत, असे सांगितले. हा दृष्टीकोन अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका न घेण हे योग्य नाही. आता निवडणुकीला सामोरे जायचं आहे. राखी जाधव यांच्या नेतृत्वात आपण निवडणुक लढणार आहोत. त्या जो निर्णय घेतील, त्यांच्या पाठीशी आम्ही राहू.