

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी देशातून ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहतील. पाकिस्तानमधील मराठी भाषिकांनी यायची ईच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये १०० मराठी लोकांची संस्था आहे. मुख्य उद्घाटक म्हणून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिलं आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार हे राजधानी दिल्लीत सरहद संस्थेच्या वतीने होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक आहेत. आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितले की, २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याच संयोजक सरहद संस्था आहे. दिल्लीत ७१ वर्षांपूर्वी साहित्य संमेलन झालं होतं. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. आतापर्यंत झालेल्या महिला अध्यक्ष मधून त्या सहाव्या महिला आहेत. संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केल आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करणार आहोत. देशातून ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहतील असं वाटतं. १५०० लोकांची राहायची व्यवस्था केली आहे. २१ तारखेला सकाळी ग्रंथ दिंडी निघेल, त्याची तयारी झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.