शरद पवार गटाला मोठा दिलासा : पिपाणी चिन्ह गोठविले

तुतारी, पिपाणीत होते साधर्म्य
NCPSP symbol
तुतारी आणि पिपाणी चिन्हात साधर्म्य असल्याने निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठविले आहे. Pudhari News Network

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीत अपक्षांना दिले जाणारे पिपाणी चिन्ह गोठविले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे या चिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. आता हे चिन्ह गोठविण्यात आले आहे.

NCPSP symbol
राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट, डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे : शरद पवार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांना मोठा फटका बसला होता. सातारा लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हावर रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवाराने चांगली मते घेतली होती. त्याचा फटका शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना बसला होता. तर नाशिकमध्येही पिपाणी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराने अधिक मते घेतली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news