Prostitution Case | हॉटेलमधून सात तरुणींची सुटका

सात तरुणींची पोलिसांनी सुटका केली असून त्यात एका अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
Prostitution Case
हॉटेलमधून सात तरुणींची सुटका File Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जास्त पैशांचे आमिष दाखवून तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रेणु मल्लाह ऊर्फ शनया ऊर्फ रिम्मी या महिलेविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिने वेश्याव्यवसायासाठी भोईवाडा येथील एका हॉटेलमध्ये पाठविलेल्या सात तरुणींची पोलिसांनी सुटका केली असून त्यात एका अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

या सर्वांना बाल आणि महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रेणू नावाची एक महिला ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवून ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार वेश्याव्यवसायासाठी काही अल्पवयीन मुलीसह तरुणींना पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. बोगस ग्राहकाने रेणूला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींसह अल्पवयीन मुलींची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे सौदा पक्का झाल्यानंतर तिने एका अल्पवयीन मुलीसह सहा तरुणींना शोभा हॉटेलमध्ये पाठविले होते, मात्र ती स्वत तिथे आली नव्हती.

बोगस ग्राहकाकडून ही माहिती प्राप्त होताच काळाचौकी पोलिसांच्या विशेष पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून या सातही तरुणींची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून रेणूच्या सांगण्यावरुन ते ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी तिथे आल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर रेणूविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मेडीकलनंतर सुटका केलेल्या सर्वांना बाल आणि महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news