मंत्रालय सुरक्षेतील दोन अधिकाऱ्यांसह सात पोलीस होणार निलंबित

Maharashtra police news | सहाव्या मजल्यावर तोडफोड करणारी धनश्री सहस्रबुद्धे अटकेत
Maharashtra police news
मंत्रालय सुरक्षेतील दोन अधिकाऱ्यांसह सात पोलीस होणार निलंबितfile photo
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात घुसून तोडफोड करणारी धनश्री सहस्रबुद्धे हिला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने मंत्रालयाच्या सुरक्षेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्रालय सुरक्षेतील ७ पोलीस निलंबित होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मंत्रालयासाठी आवश्यक प्रवेश पास न घेता धनश्री सहस्रबुद्धेने सचिव प्रवेश- द्वारातून प्रवेश केला. त्यामुळे या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने मंत्रालय सुरक्षेतील कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या घटनेची दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. त्यानंतर मंत्रालयाचे सीसीटीव्ही तपासले असता सचिव गेटवर सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी तिला हटकले नाही किंवा तिला कोणीही विचारले नसल्याचे दिसले. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि शिपाई असा सात जणांचा समावेश असल्याचे समजते. धनश्रीने गुरुवारी सहाव्या मजल्यावर असलेल्या उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून कुंड्या फेकल्या आणि नावाची पाटीही काढून फेकून दिली होती. या घटनेनंतर फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धनश्रीचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे समजते. ती दादर येथे घरी एकटीच राहते. काही वर्षांपूर्वीच आई-वडील वारले असून बहिणीचेही लग्न झालेले आहे. ती राहात असलेल्या सोसायटीत ती अनेकदा चाकू घेऊन फिरत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सोसायटीमधील इतर लोकांच्या दारावर झाडू आपटत फिरत असल्याचेही व्हिडीओ आता समोर आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news