

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : करुणा मुंडे यांना दर महिन्याला २ लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेश वांद्रे न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना दिले होते. मुंडे यांनी या आदेशाला आव्हान देणारी याचिका माझगाव सत्र न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका आज (दि.५) न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे मुंडे यांना धक्का बसला आहे.
आज झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा मुंडेंकडून महत्वाची कागदपत्रे पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आली. धनंजय मुंडेंचे अंतिम इच्छापत्र आणि स्विकृती पत्र ही दोन महत्वाची कागदपत्रांचा पुराव्यात समावेश होता. याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.