मुंबईत नोकराचे Money Heist : दोन कोटींच्या सोन्याच्या विटा चोरून पोबारा

एक कोटीच्या दोन सोन्याच्या विटा घेऊन नोकराचे पलायन
Money Heist of Mumbai servant : two 
Brick Cost of 2 Core stolen
सोने असलेली बॅग चोरट्यांनीPudhari File Photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जुहू येथे राहणार्‍या एका वयोवृद्ध व्यावसायिकाच्या नोकराने सुमारे एक कोटींच्या दोन सोन्याचा विटा घेऊन पलायन केल्याची घडली. प्रभूनारायण मिश्रा असे नोकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या नोकराचा जुहू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत

जगदीशकुमार मदनलाल गुप्ता (वय.76) वर्षांचे वयोवृद्ध व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत जुहूच्या जेव्हीपीडी स्किम परिसरात राहतात. त्यांच्याकडे प्रभूनारायण हा घरगडी म्हणून कामाला होता. गेल्या अठरा महिन्यांपासून तो काम करत असल्याने त्याच्यावर त्यांचा विश्‍वास होता. काही दिवसांपूर्वीच प्रभूनारायण हा त्यांच्याकडील नोकरी सोडून निघून गेला होता.

Money Heist of Mumbai servant : two 
Brick Cost of 2 Core stolen
औरंगाबाद : कचनेर सोन्याची मूर्ती चोरी प्रकरण : दोघांना मध्य प्रदेशातून अटक, २४ तासांत प्रकरणाचा छडा

दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या कपाटाची पाहणी केली असता त्यांना कपाटातील दोन सोन्याच्या विटा चोरीस गेल्याचे दिसून आले. या दोन्ही विटांची किंमत सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. या चोरीनंतरच प्रभूनारायण हा पळून गेला होता. त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी त्यांचाकडे कामाला असलेले प्रविण रामकृष्ण घाग याला जुहू पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर प्रविणने त्यांच्या वतीने जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रभूनारायण मिश्रा याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news