School Uniform: शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप बंधनकारक; निकृष्ट कापड आढळल्यास कारवाई

शिलाईचे काम महिला बचत गटांकडून
School Uniform
School UniformPudhari
Published on
Updated on

मुंबई: शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपात होणाऱ्या दिरंगाईची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे आढळल्यास पुरवठादार, संबंधित शाळा व्यवस्थापन समितीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. गणवेशाचे दर्जेदार कापड, शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी वाटप, स्थानिक महिला बचत गटांकडून शिलाई तसेच गुणवत्तेची कठोर तपासणी, याबाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

School Uniform
Sting Operations: ११८ स्टिंग ऑपरेशन्स, फक्त १३ कारवाया! गर्भलिंग तपासविरोधी पथकाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा, यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. गणवेशावर समग्र शिक्षा अभियानाचा लोगो लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशांपैकी एक गणवेश स्काऊट-गाईड उपक्रमाला अनुरूप असावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पँट आणि मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असलेला पिनो फ्रॉक. तसेच, ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाचा व कमीज आकाशी रंगाची अशी रचना असणार आहे.

गणवेशाची गुणवत्ता तपासणार

गणवेशाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून नियमित तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, प्रयोगशाळेत नमुने तपासण्याची व्यवस्था करण्यात आली.

School Uniform
Plastic Notes: 50, 100, 500 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार; आरबीआयचा पायलट प्रोजेक्ट लवकरच?

गणवेशाची गुणवत्ता चांगली असल्याची खात्री झाल्यानंतरच पुरवठादाराला रक्कम दिली जाणार आहे. शासनाच्या अनुदानासोबतच अधिक दर्जेदार गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांनी सीएसआर निधी व लोकसहभागातून अतिरिक्त निधी उभारण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news