School Bus Fare Hike | स्कूल बसच्या भाड्यात १५ टक्के वाढ; नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांच्या खिशाला कात्री

इंधन, वेतन, देखभाल खर्च वाढल्याने स्कूल बस संघटनेचा निर्णय
School Bus Fare Hike |
School Bus Fare Hike | स्कूल बसच्या भाड्यात १५ टक्के वाढ; नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांच्या खिशाला कात्रीfile photo
Published on
Updated on

मुंबई : शालेय शुल्काबरोबरच वह्या-पुस्तकांचे दर वाढल्याने अगोदरच मेटाकुटीला आलेल्या पालकांना आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच खिशाला कात्री लागणार आहे. राज्यातील स्कूल बस वाहतूक सेवेत १५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (एसबीओए) यांनी जाहीर केला आहे. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही आर्थिक मदत किंवा दिलासा न मिळाल्याने ही दरवाढ अपरिहार्य ठरल्याचा दावा संघटनेने करत ही भाववाढ जून पासून लागू केली आहे.

का दरवाढ करावी लागणार....

डिझेल आणि इंधन खर्चात वाढ

चालक व कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

वाहन देखभाल, दुरुस्तीचा वाढता खर्च

सुटे भाग व उपभोग्य साहित्य महागले

विमा, फिटनेस, वैधानिक शुल्कांत वाढ

टोल व परवाना खर्चात वाढ

ई-चलन आणि दंडाचा वाढता भार

पालकांचे बजेट कोलमडणार

मासिक खर्चात होणार मोठी वाढ

दोन किंवा अधिक मुले असलेल्या

कुटुंबांवर पडणार अधिक भार

शाळा शुल्क, वह्या-पुस्तके आणि

वाहतूक खर्चाचा बसणार दुहेरी फटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news