

मुंबई: आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. पवार यांच्या मते, शिरसाठ यांनी २०२४ साली सिडकोचे अध्यक्ष होताच नवी मुंबईतील १५ एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिली, ज्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांशी गद्दारी झाल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
आ. पवार यांनी असा दावा केला आहे की, मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाठ यांनी इतिहासातील गद्दारांशी हातमिळवणी केली. पवार यांच्या आरोपानुसार, इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तींना जमीन देणे म्हणजे आजच्या गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हातमिळवणी आहे. त्यामुळे पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे की, संजय शिरसाठ यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स नेमावी किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी.
आमदार रोहित पवार यांच्या खलबळजनक आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पवार यांनी पत्रकार परिषदेतून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे. महायुती सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप होत असल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे
कॅश पॅकेट व्हिडीओचा फटका
जुलै महिन्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात मंत्री संजय शिरसाठ एका खोल खोलीत, कॅश बॅग जवळ बसले असल्याचे दिसत होते. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी या व्हिडीओवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शिरसाठांनी हा आरोप नाकारत सांगितले की, "तो बॅग कपड्यांनी भरण्यातला होता"
सार्वजनिक निधीविषयी उदासीन विधान
आकोल्याच्या कार्यक्रमात सरकारच्या निधीविषयी संजय शिरसाठ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, "सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?". अशा प्रकारच्या विधानांमुळेही ते वारंवार चर्चेत राहिले आहेत.