

Sanjay Raut On Fadanvis :
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी कोवीडच्या काळात काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर संजय राऊत यांनी अत्यंत जहाल भाषेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं.
सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, सध्याच्या समस्यांवर बोलण्याऐवजी हे लोक 1950 सालचे किंवा 1940 सालचे विषय काढत बसतात. त्यांनी कठोर शब्दांत भाजपावर टीका केली: "अरे तुमचं बोला ना तुम्ही काय शे* खाताय ते बोला," असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारला, 'पीएम केअर फंड मध्ये किती पैसे आहेत हे फडणविसांना माहिती आहे का?". जर त्यांना माहिती नसेल, तर मी स्वतः तो आकडा देतो, महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली आणि केवळ मुंबईतील फार्मा कंपन्यांनी किती लाख कोटी रुपये दिले, याची माहिती मला आहे.' त्यांनी, महाराष्ट्रातून कोट्यावधी, हजारो, शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये जमा झाले आहेत, जे अनकाउंटेड आहेत, असे गंभीर आरोप देखील आहे.
याचबरोबर संजय राऊत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी मुंबई दौऱ्यावरूनही निशाणा साधला. राऊत म्हणाले की, उद्या नरेंद्र मोदी येत आहेत, त्यांचे काहीतरी मेट्रोचे उद्घाटन आहे. तसेच अमित शहा येत आहेत, त्यांचाही असाच काहीतरी उपक्रम असेल. या पार्श्वभूमीवर त्यांनी ज्वलंत प्रश्न विचारला की, "मोदी शहा मुंबईला येत असतील तर मराठवाड्याला कोण जाणार?".
राऊत यांनी म्हणाले की, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांशी कोण बोलणार? जर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शहा करणार असतील, तर आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ.'