Sanjay Raut On Deputy PM: दिल्लीतील मंत्री नाही तर संघाचा 'अज्ञात' चेहराच होणार उपपंतप्रधान... संजय राऊतांचा छातीठोक दावा

Sanjay Raut On Deputy PM
Sanjay Raut On Deputy PMpudhari
Published on
Updated on

Sanjay Raut On Fadnavis: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गाटाकडून सर्वोच्च न्यायालयात पक्ष चिन्हाच्या याचिकेवर करण्यात आलेल्या युक्तीवादावर भाष्य केलं. त्याचबरोबर संजय राऊत यांना फडणवीस हे दिल्लीत जाणार की राज्यातच राहणार याबाबतचा देखील प्रश्न विचारण्यात आला होता.

या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी एक मोठा अन् छातीठोक दावा केला. त्यांनी आरएसएस उपपंतप्रधान म्हणून एक अज्ञात चेहरा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला.

Sanjay Raut On Deputy PM
Sanjay Raut : "भोंग्याला सूर असला पाहिजे..." : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

देशात सध्या मोठी व्हेकन्सी

संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या मुलाखतीचा आधार घेत काही दावे अन् वक्तव्ये केली आहेत. त्यांनी भारतामध्ये सध्या व्हेकन्सी असून प्रधानमंत्री पदाची तसेच गृहमंत्री पदाची देखील व्हेकन्सी आहे. जर देवेंद्रजींना याची माहिती नसेल तर ती माहिती आम्ही देतो.

सध्या पंतप्रधान पदासाठी दीर्घकाळापासून अमित शहा हे वेटिंवर आहेत. या देशाचा गृहमंत्री पदावरचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला असल्याचं मी पाहिलेलं नाही. मात्र अमित शहा हे प्राईम मिनिस्टर इन वेटिंग आहेत. ते स्वतःच असं मानतात लोकं नाही. ते काही पंतप्रधान होणार नाहीत. राजनाथ सिंह यांचे नाव देखील आहे मात्र मला याबाबत शंका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवायचं आहे. मोठी जबाबदारी द्यायची आहे अशी मला माहिती मिळाली आहे.

Sanjay Raut On Deputy PM
Sanjay Raut | सिंहस्थ कुंभमेळ्यात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार? संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

मी म्हणतोय ते हळूहळू समोर येईल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आतल्या गोटातील माहिती सांगतो, पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात तात्काळ दिल्लीत कार्यरत नसलेल्या एका महत्वाच्या व्यक्तीची किंवा नेत्याची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती व्हावी ही संघाची भूमिका आहे. मी म्हणतोय ती भूमिका हळूहळू तुमच्या समोर येईल.

संघाचे म्हणणे आहे की मोदींच्या मंत्रीमंडळात त्यांचा वारसदार म्हणून जी व्यक्ती आपण देणार आहोत त्या व्यक्तीची उपपंतप्रधान पदी नियुक्ती व्हावी. ती व्यक्ती सध्या दिल्लीत नाही एवढंत मला माहिती आहे. यासाठीच मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यासाठी काही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागणार आहेत. वरिष्ठ मंत्र्यांनी आधी अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा मगच आम्ही राजीनामा देऊ असं सांगितलं आहे.

Sanjay Raut On Deputy PM
Sanjay Raut : युवा पिढीत भाजपच्या 'आयटी सेल'लाही टाळे ठोकण्याची ताकद : संजय राऊत

त्यांच्या वकिलांचा आकडा पाहून चक्कर येईल

संजय राऊत यांनी 'सध्या शिवसेना पक्षचिन्हाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी शिंदे यांच्या वकिलांचे आकडे पाहून तुम्हालाच चक्कर येईल. त्याचे वकील काय म्हणतात याला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. ते मोठे वकील आहेत. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले की नाही एवढाच प्रश्न आहे.

टेन्थ शड्युल यावर युक्तीवाद आहे. यांची रडगाणी सुरूच आहेत पण मातोश्रीने तुम्हाला शिखरावर नेले. तुम्ही मंत्री झाला, तुमचा मुलगा खासदार झाला. डेप्युटी सीएम आहात, पैसे देऊन आमदार फोडता. ते कायद्यावर बोलतात का?'

राऊत पुढे म्हणाले की, 'टीएन शेषण यांनी जी मांडणी आखून दिली. त्याप्रकारेच आम्ही घटना केली. एकनाथ शिंदे यांची निवड देखील त्याच प्रकारे झाली होती. आयोगाला काय उत्तर द्यायचे ते हे व्यासपीठ नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news