पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने आज (दि.५) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली. संजय कुमार वर्मा हे १९९०च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.४) राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले होते. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना मंगळवार (दि.५) दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवल्यानंतर आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.
राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी आढावा बैठका घेण्यात आल्या. दरम्यान काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्यावेळी अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्षपणे त्यांचे कर्तव्य पार पाडताना पक्षपातीपणा करू नये अशा इशारा देखील आयुक्तांनी दिला होता.