Sangram Patil case|युट्युबर संग्राम पाटील यांना दिलासा; मुंबई हायकोर्टाचे 'लूक आऊट सर्कुलर' बदलण्याचे आदेश

तपास यंत्रणांना आवश्यकतेनुसार सहकार्य करण्याचे पाटील यांचे प्रतिज्ञापत्र
Sangram Patil case|युट्युबर संग्राम पाटील यांना दिलासा; मुंबई हायकोर्टाचे 'लूक आऊट सर्कुलर' बदलण्याचे आदेश
Published on
Updated on

मुंबई : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कायदेशीर कचाट्यात सापडलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि प्रसिद्ध युट्युबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पाटील यांच्या विरोधात बजावण्यात आलेल्या लूक आऊट सर्क्युलरमध्ये (LOC) तातडीने बदल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, यामुळे त्यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

काय आहे प्रकरण?

संग्राम पाटील १० जानेवारी रोजी भारतात आले होते. त्यानंतर १९ जानेवारीला ते पुन्हा ब्रिटनला परतणार होते. मात्र, भाजप नेत्यांविरोधातील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांच्या नावे 'लूक आऊट सर्कुलर' (LOC) जारी करण्यात आले होते. यामुळे १९ जानेवारीला विमानतळावर पोहोचले असता त्यांना रोखण्यात आले. तेव्हापासून म्हणजेच गेल्या साडेतीन महिन्यांपासून संग्राम पाटील भारतातच अडकून पडले होते.

न्यायालयाचा आदेश आणि हमीपत्र

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत संग्राम पाटील यांनी एक महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘तपास यंत्रणांना जेव्हा गरज पडेल, तेव्हा मी स्वतः हजर राहून पूर्ण सहकार्य करेन,’ असे हमीपत्र त्यांनी दिले आहे. राज्य सरकारने पाटील यांचे हे प्रतिज्ञापत्र मान्य केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news