FDA inspection : डॉमिनोजसह ५ साखळी रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

राज्यभर एफडीएची धडक मोहीम; १०४ आस्थापनांची तपासणी, ९५ सुधारणा नोटिसा
FDA inspection
FDA inspectionpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर साखळी रेस्टॉरंटविरोधात धडक कारवाई केली. राज्यातील १०४ चेन रेस्टॉरंटची तपासणी करून दोन आस्थापनांचा व्यवसाय तत्काळ बंद, तर ९५ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यात मुंबईतील डॉमिनोजच्या तीन शाखांचा समावेश आहे.

११ ऑगस्ट रोजी डॉमिनोज, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स, मोंजिनीस आदी साखळी रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. मुंबईतील विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील डॉमिनोजच्या शाखांमध्ये स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीटक प्रतिबंधक उपाययोजना, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नोंदी यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या.

FDA inspection
Mumbai biker accident: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; मुंबईच्या २४ वर्षीय बाईकरचा मृत्यू

घाटकोपरच्या आर-सिटी मॉलमधील डॉमिनोजमध्ये स्वच्छता व सॅनिटेशनची अपुरी व्यवस्था, कीटकांचा प्रादुर्भाव, अन्न साठवणुकीत एफआयएफओ एफईएफओ पद्धतीचा अभाव, तापमान नियंत्रणातील त्रुटी तसेच अन्न सुरक्षा नोंदी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. बोरिवलीतील शाखेत ५४ टक्के गुणांसह नियमांचे पालन झाले नसल्याचे आढळले.

सातारा जिल्ह्यातील कराड परिसरातील डॉमिनोज आणि सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेडच्या आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आले. कराड येथील पिझ्झा केंद्रात शाकाहारी व मांसाहारी पिझ्झासाठी स्वतंत्र ओव्हन व पॅनची व्यवस्था नसल्याचे आढळले.

दरम्यान, मुंबईतील दोन धाब्यांसह नाशिक, पालघर आदी ठिकाणच्या हॉटेल, रेस्टॉरंट व खाद्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. राज्यभरातील कारवाईत दूध व दुग्धजन्य पदार्थांसह विविध अन्नपदार्थांचा सुमारे ३५.७७ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित पानमसाला व गुटख्याच्या प्रकरणांत १२ एफआयआर दाखल करून १५ जणांना अटक करण्यात आली.

दूध, तूप, तेल आणि मिठाईही जप्त

रायगडमध्ये ६९८ लिटर संशयित निकृष्ट दूध, नाशिकमध्ये ३९७.६ किलो संशयित निकृष्ट गायीचे तूप, तर कोल्हापूरमध्ये १,३४५ किलो संशयित निकृष्ट गूळ जप्त करण्यात आला. पुण्यात ५९८ किलो मावा मिठाईवर, नाशिकमध्ये १,२३६.९ किलो मिठाईवर आणि हिंगोलीत सुट्ट्या विक्रीस ठेवलेले ७१८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

मुंबई मेट्रो ढाबा

भांडुप येथील जेव्हीएलआर लिंक रोडवरील या धाब्यात कच्च्या मालाची साठवणूक, स्वच्छता, पिण्याचे पाणी, कीटक प्रतिबंधक उपाययोजना तसेच कच्चे-शिजवलेले व शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचे योग्य विलगीकरण याबाबत त्रुटी आढळल्याने परवाना निलंबित केला.

FDA inspection
Belgaum Fraud Case: महिलेची दीड कोटींची फसवणूक

गुलसान द पंजाबी ढाबा

भांडुप येथील जेव्हीएलआर लिंक रोडवरील या धाब्यात पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी, हवा खेळती राहण्याची व्यवस्था, कीटक नियंत्रण आणि अन्न साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने परवाना निलंबित केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news