Polytechnic Girls Admission: तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी यंदा ६९ टक्के प्रवेश ग्रामीण भागातील मुलींचे

३८ हजारपैकी २६ हजारांहून अधिक मुली गावखेड्यातील : १० वर्षांत प्रवेश दुपटीहून अधिक; शहरांना टाकले मागे
Polytechnic Girls Admission
Polytechnic Girls AdmissionPudhari
Published on
Updated on

पवन होन्याळकर

मुंबई: एकेकाळी पॉलिटेक्निक शिक्षणात केवळ शहरांमधील मुलींचेच प्रमाण अधिक असायचे. आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी शहरांनाही मागे टाकले आहे. यंदा राज्यात पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण ३८,३०७ मुलींपैकी तब्बल २६,४७८ (६९.१ टक्के) विद्यार्थिनी गावखेड्यातील आहेत. या तुलनेत शहरी मुलींची संख्या अवघी ११,८२९ (३०.९ टक्के) इतकी आहे. गेल्या १० वर्षांत दुपटीहून अधिक प्रवेश झाल्याचे पाहायला मिळते.

यंदा पॉलिटेक्निक प्रवेशासाठी राज्यभरातून तब्बल ४८,६३८ विद्यार्थिनींनी नोंदणी करत तंत्रशिक्षणाची इच्छा दर्शवली होती. त्यापैकी ३८,३०७ मुलींनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला. विशेष म्हणजे, तंत्रशिक्षणाची वाट धरणाऱ्या दर तीन मुलींमागे दोन मुली गावखेड्यातील आहेत. गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा बदल थक्क करणारा आहे.

Polytechnic Girls Admission
Edible Oil Seizure: भेसळीच्या संशयाने ७ हजार किलो खाद्यतेल जप्त; दोन तेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित

२०१७-१८ मध्ये जेमतेम १७ हजार मुली तंत्रशिक्षणाकडे वळल्या होत्या आणि एकूण प्रवेशात त्यांचा वाटा २७.५ टक्के होता. यंदा मुलींचा हा वाटा ३३.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढलेल्या या आकडेवारीवरून मुलींच्या शैक्षणिक क्रांतीला राज्य सरकारच्या ‘मोफत शिक्षण’ योजनेचे मोठे बळ मिळाल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा ग्रामीण कुटुंबांना झाला. तंत्र शिक्षणातील शिक्षणात झालेले बदल, तसेच आता रोजगाराची हमी, याबरोबरच पालकांची बदललेली मानसिकता यामुळे पदविका अभियांत्रिकीकडे मुलींचा कल झपाट्याने वाढत असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

Polytechnic Girls Admission
Egg Price Increase: अंड्यांच्या दरानेही गाठली उसळी! वर्षभरात ४०% वाढ; किरकोळ भाव ९ रुपयांवर

२०२६-२७ मधील प्रवेशाचे चित्र

ग्रामीण मुलींचा वाटा : ६९.१% (२६,४७८)

शहरी मुलींचा वाटा : ३०.९% (११,८२९)

एकूण प्रवेशांमधील वाटा : ३३.४% (३८,३०७)

मुलींना व्यावसायिक शिक्षणाच्या समान आणि व्यापक संधी मिळाव्यात, आर्थिक अडचणींमुळे त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांपासून वंचित राहू नयेत, यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम पॉलिटेक्निकमधील मुलींच्या वाढत्या प्रवेशातून दिसून येत आहे.

- डॉ. प्रमोद नाईक, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news