RTO fare for all app-based cabs : सर्व अ‍ॅप कॅबसाठी आरटीओचेच दर

आयडी ब्लॉक नाकारण्याचे कंपन्यांना आदेश
RTO fare for all app-based cabs
सर्व अ‍ॅप कॅबसाठी आरटीओचेच दर puidhari photo
Published on
Updated on

मुंबई : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अ‍ॅप आधारित सेवेसाठी लागू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेणायात आला. ओला-उबरचे अधिकारी, अ‍ॅप आधारित टॅक्सी - रिक्षा चालकांचे नेते आणि आरटीओचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात ही बैठक झालाी. महत्वाच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आझाद मैदानातील उपोषण मात्र सुरूच राहाणार आहे.

अ‍ॅप आधारित टॅक्सी - रिक्षा चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 15 जुलैपासून संप आणि आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. पाच दिवसांनंतर संप स्थगित केला. या संपाची झळ जशी प्रवाशांना बसली अशीच हातावर पोट असलेल्या अ‍ॅप आधारित टॅक्सी-रिक्षा चालकांना बसली. शेवटी नाईलाजाने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र मंगळवारच्या बैठकीत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा मोठ्या संख्येने चालक संपावर जातील, असा इशारा चालकांच्या महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेने दिला होता.

या मागण्यांबाबत मंगळवारी बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली. परिवहन विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत कळसर बैठकीला उपस्थित होते. चालकांनी जास्त पैसे घेतले तर कंपन्या त्यांचे आयडी ब्लॉक करत होत्या. मात्र आरटीओचे दर तपासूनच याबाबतचा निर्णय घ्यावा असे आदेश कंपन्यांना देण्यात आले. आज फक्त सकारात्मक चर्चा झाली. बुधवारी सर्व मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच पुढील भूमिका ठरवली जाईल, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

चालकांचे दर आज ठरणार - संपकर्‍यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. कंपन्यांकडूनच लेखी आश्वासन न मिळाल्याने संघटनेला आम्ही लेखी देऊ शकलो नाहीत. मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत. उद्या 23 जुलै 2025 रोजी ओला-उबेर या कंपन्यांकडून ते आत्ता कोणते रेट चालकांना देत आहेत, त्याबाबत लेखी माहिती घेऊन उद्या बुधवारी याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल

भरत कळस्कर, सहाय्यक परिवहन आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news