

मुंबई : कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभे करून भाजपची बी टीम म्हणून काम केले. जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या जिल्ह्यातील पराभवानंतर रोहीत पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपली खदखद व्यक्त केली. जनतेने दोनदा मतांचे दान भरभरून पदरात टाकले. त्यांच्या मी कायम ऋणात राहीन. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. तरीही लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे.