मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून 22 आमदार फोडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधून आगामी निवडणूक लढवतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मात्र, त्यांचा हा दावा पोकळ असून, रोहित पवार हे भविष्य कधीपासून पाहू लागले, असा टोला त्यांच्या विरोधकांनी लगावला आहे.
अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवार यांची भेट घेतली होती. पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण भेट घेतल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काही आमदारही भाजपच्या गळाला लागले आहेत. मावळचे आमदार भाजपमधून लढणार आहेत, असेही रोहित पवार म्हणाले. सुनील तटकरे यांना ‘सिल्व्हर ओक’वरील चहा आवडत असेल, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.