राज्यात साथीच्या आजारांत वाढ; मलेरिया, डेंग्यूचे ३४ बळी

Epidemic Diseases | मुंबईत मलेरियाचे ४ हजार ९२१ रुग्ण
Epidemic diseases
राज्यात साथीच्या आजारांत वाढ; मलेरिया, डेंग्यूचे ३४ बळीfile photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन आहे. अशा प्रकारच्या हवामान बदलामुळे संसर्गजन्य रोगांसाठी पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळेच राज्यात साथीच्या आजारांचा (Epidemic diseases) प्रभाव वाढला आहे. राज्यात २६५ दिवसांत मलेरियाचे १३ हजार हजाराहून अधिक तर डेंग्यूचे ८ हजाराहन अधिक रुग्ण आढळले आहेत. या दोन आजारांमुळे आतापर्यंत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. सध्या अनियमित पाऊस तसेच सतत बदलणारे वातावरण यामुळे पावसाळी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात जानेवारी ते २१ सप्टेंबर या कालावधीत मलेरियाचे एकूण १३ हजार २५० रुग्ण आढळले आहेत, तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ५ हजार ६०३ रुग्ण आहेत आणि ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत ४ हजार ९२१, नवी मुंबईत ५६८, ठाण्यात ५४१, एक मृत्यू, चंद्रपूरमध्ये ४६८, गोंदियामध्ये ३४९, रायगडमध्ये २८२, पनवेलमध्ये ५०० रुग्णांची नोंद झाली आहे.

डेंग्यूचे एकूण ८ हजार ६८६ रुग्ण आढळून आले असून, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, मुंबईत २ हजार ८३५, नाशिकमध्ये १हजार १०१, कोल्हापुरात ९७८, ठाणे जिल्ह्यात ५७०, पालघरमध्ये ३५०, रायगडमध्ये ३२४, नागपूरमध्ये ३६०, चंद्रपूरमध्ये २९६, चंद्रपूरमध्ये १५० प्रकरणं आहेत. गडचिरोलीमध्ये १५०, छत्रपती संभाजी नगरमध्ये ९५ प्रकरणे, सांगलीमध्ये १६६, अमरावतीमध्ये २३६, लातूरमध्ये १८५, पुण्यात २५१ प्रकरणे आढळून आली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news