

मुंबई : भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावणकुळे आज (दि.११) शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी आले आहेत. शिरसाट यांच्या मुंबईतील घरी बावनकुळे दाखल झाले आहेत. मात्र या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आणि गुलदस्त्यात असल्याचे समोर येत आहे.
संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून निधी वाटपाबाबत नाराजीचा सुर व्यक्त केला होता. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे शिरसाट नाराज झाले होते. यानंतर अजित पवार यांनी सुद्धा शिरसाट यांच्या नाराजीवर वक्तव्य केले होते. पुन्हा शिरसाट यांच्या खात्यातील निधी वळवल्यामुळे शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज बावणकुळे शिरसाट यांच्या भेटीला आल्याने या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.