Cyber Fraud: मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून 1.68 कोटींची फसवणूक

तक्रारदार 80 वर्षांचे असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत ग्रँट रोड परिसरात राहतात.
Fund
MoneyPudhari
Published on
Updated on

मुंबई: मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून मर्चट नेव्हीच्या निवृत्त रेडिओ इंजिनीअरची 1 कोटी 68 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शिवा प्रसाद, निकिता पंत आणि नवजोत सिमी नाव सांगणाऱ्या तोतया सीबीआय, ईडीच्या अधिकाऱ्याविरुद्ध दक्षिण सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार 80 वर्षांचे असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत ग्रँट रोड परिसरात राहतात. 2001 साली ते मर्चंट नेव्हीमधून रेडिओ इंजिनीअर म्हणून निवृत्त झाले आहे. मार्च महिन्यांत त्यांना शिवा प्रसाद नावाच्या बंगलोरच्या अशोकनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा कॉल आला होता. त्याने त्यांना सलाकत खान नावाच्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Fund
Bank loan default property rights: सरकारी जप्तीआधी बँकेला मालमत्ता विक्रीचा अधिकार; हायकोर्टाचा निर्णय

त्याच्याकडे पोलिसांना त्यांच्या नावाने डेबिट कार्ड सापडले आहे. त्यांच्या बँक खात्यात मनी लाँडरिंगची रक्कम जमा झाली असून त्यातील काही रक्कम सलाकत खानला पाठविण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असून त्यांची चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. तपासात सहकार्य करा, नाहीतर त्यांच्या घरी पोलीस पथक पाठवून त्यांना अटक केली जाईल, असे त्यांना सांगितले.

याच दरम्यान त्यांची निकिता पंत आणि नवजोत सिमी नाव सांगणाऱ्या सीबीआय आणि ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांच्या बँक खात्यासह इतर गुंतवणुकीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना ती रक्कम कोर्टच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. चौकशी झाल्यानंतर त्यांना ती रक्कम व्याजासहीत दिली जाईल, असे सांगितले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार आजोबांनी मार्च ते मे 2026 या कालावधीत त्यांना दिलेल्या बँक खात्यात 1 कोटी 68 लाख रुपये पाठविले. ही रक्कम पाठविल्यानंतर त्यांची कोणीही चौकशी केली नाही किंवा त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात परत जमा झाली नव्हती.

Fund
Political News: राष्ट्रवादीतील वादावर पदाधिकाऱ्यांकडून पडदा; प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष,तर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्याचा निर्वाळा

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दक्षिण सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवा प्रसाद, निकिता पंत आणि नवजोत सिमी नाव सांगणाऱ्या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news